- October 4, 2022
- No Comment
विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ, सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल
पिंपरी: विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला तलाक देणाऱ्या पती व त्याच्या आई-वडिलांवर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 27 वर्षीय पीडितेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पती, सासू व सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला जाणूनबुजून शारीरिक व मानसिक त्रास दिला. तसेच पतीने अनैसर्गीक शारीरिक संबंध ठेवला. फिर्यादीच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ केली. तसेच जाचक त्रास करत पतीने पीडितेला तलाक देऊन टाकला. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.