- October 9, 2022
- No Comment
अनाधिकृत धंद्यावर कारवाई, चौदा टाळकी जेरबंद
हडपसर: हडपसर पोलिसांनी अवैध धंद्यावर तीन वेगवेगळ्या कारवाईमध्ये एकूण आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करत 14 आरोपींनी अटक केले आहे.
पहिली कारवाई:
हडपसर पोलिसांनी दादाराव गोरख गोरे (वय 43 रा. हडपसर) याला अटक केले. गोरे याच्यावर 7 गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात आधीपासूनच दाखल होते. त्यामुळे हडपसर पोलिसांनी गोरे याच्यावर तडीपारीची कारवाई करत त्याला दोन वर्षापासाठी तडीपार केले आहे.
दुसरी कारवाई:
पोलिसांनी पोलिसांच्या रोकॉर्डवर असणाऱ्या लॉरेन्स राजु पिल्ले (वय42 रा.मांजरी) हा हडपसर येथे असल्याची खबर मिळताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याचे साथीदार ऋषिकेश जगदीश भोजणे (वय 32), मंगेश सुनिल पवार (वय 32,) यांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी यावेळी 1 किलो 448 ग्रॅम गांजा, व 120 ग्रॅम चरस असे एकूण 5 लाख 50 हजार 525रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त केले आहे. यातील मुख्य आरोपी लॉरेन्स याला पिरमंडळ पाच यांनी 28 जानेवारी रोजी दोन वर्षाकरीत तडीपार केले होते.
तिसरी कारवाई:
हडपसर पोलिसांनी फुरसुंगी येथील एका मटका अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी 11 आरोपींना अटक केले.यावेळी त्यांच्याकडून पोलिसांनी जुगार साहित्य 9 मोबाईल,4 दुचाकी असा एकूण 2 लाख 95 हजार 70 रुपयांचा ऐवज जप्त केला.आरोपींवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.
सदरची कारवाई हडपसर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक अविनाश शिंदे, तृप्ती खळदे, पोलीस अमंलदार वसिम सय्यद, गिरीधर एकोर्गे,बाबासाहेब शिंदे, तपास पथकाचे पोलीस अमंलदार सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदिप राठोड, सचिन जाधव, शाहिद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, अतुल पंधरकर यांनी केली.