• October 9, 2022
  • No Comment

सराईताकडुन सहा किलो गांजा जप्त, आरोपी जेरबंद

सराईताकडुन सहा किलो गांजा जप्त, आरोपी जेरबंद

    लोणी काळभोर: लोणी काळभोर परिसरातून एकाला सहा किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पुणे पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने आळंदी म्हातोबाची येथे केली आहे

    चंद्रकांत सुरेश पवार (वय 21 रा. आळंदी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात गस्त घालत असताना तपासी पथकाला खबर मिळाली की, पानमळ्याकडून फुकट वाडीकडे जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर रेल्वे ब्रीज जवळ एक इसम त्याच्या दुचाकीवर पोते बांधून संशयित रित्या गाडीवर बसलेला आहे. पोलिसांचे पथक तेथे गेले व त्यांनी दुचाकीस्वाराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्या पोत्यात 1 लाख 22 हजाररुपयांचा 6 किलो 107 ग्रॅम वजनाचा गांजा असल्याचे समोर आले.

    पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याकडून गांजा, दुचाकी व मोबाईल असा एकूण 1 लाख 79 हजार 140 रुपयांचा ऐवज जप्त केला.लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…
    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी दुर्घटना टळली रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट

    हिंदुस्तान पेट्रोलियमच्या समोर असलेले अमित बिर्याणी हॉटेलला आग, मोठी…

    लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कृष्णा लॉजजवळील ‘अमित बिर्याणी’ हॉटेलमध्ये मंगळवारी (दि.१७) रात्री गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *