• October 10, 2022
  • No Comment

खोट्या कागदपत्रांच्या आधारे बाविस गुंठे जागा हडपली

खोट्या कागदपत्रांच्या आधारे बाविस गुंठे जागा हडपली

    दिघी: बनावट कागदपत्रांच्या आधारे 22 गुंठे जागेवर बेकायदेशीरपणे ताबा घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार डुडुळगाव येथे घडला.

    मारुती डेव्हलपर्स तर्फे सुरेश जयंतीलाल पटेल (रा. मोशी), दिलीप किसन पवार, राजेश किसन पवार, शिवाजी लक्ष्मण पवार, ज्ञानेश्वर लक्ष्मण पवार, तुकाराम लक्ष्मण पवार, नऊ महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी खंडू बळवंत पवार (वय 62, रा. गोळेवाडी, आंबी, ता. मावळ) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची डुडुळगाव येथे 44.75 गुंठे जागा आहे. त्यातील 22 गुंठे जागेवर आरोपींनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून त्याआधारे अतितातडीची बनावट मोजणी केली. ती खरी आहे असे भासवून जबरदस्तीने अतिक्रमण करून बेकायदेशीररीत्या ताबा घेतला.फिर्यादी त्या जागेत गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्या जागेवर अनधिकृत बोर्ड लावून त्यावर एक कंटेनर उभा करून एक जोडपे ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

    दिघी पोलीस तपास करीत आहेत

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या ताब्यात

    गुलटेकडी मार्केट यार्डात अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन; आरोपी हमाल पोलिसांच्या…

    पुणे : पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्ड आवारातील फळबाग विभागात खरेदीसाठी वडिलांसोबत आलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना घडली.…
    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस कोठडी

    पुण्यात ६ कोटींची ऑनलाईन फसवणूक; आरोपीस ७ दिवसांची पोलीस…

    पुणे : शिवाजीनगर परिसरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या आमिषाने तब्बल ६ कोटी ३० लाख ३५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला…
    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण वातावरणात संपन्न,96 स्वराज्य रथांचा सहभाग

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा भव्य उत्सवपूर्ण…

    पुणे: 19 फेब्रुवारी 2026 रोजी लाल महल येथून मिरवणूक, ढोलताशा, रणरागिणी आणि पुष्पवृष्टीचे आकर्षण शिवजयंती महोत्सव समिती पुणे तर्फे दरवर्षीप्रमाणे याही…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *