• October 11, 2022
  • No Comment

अनाधिकृत सावकारी करणाऱ्यास अटक चिंचवड पोलिसांची कामगिरी

अनाधिकृत सावकारी करणाऱ्यास अटक  चिंचवड पोलिसांची कामगिरी

चिंचवड: 6 लाख रुपये कर्ज देऊन 27.60 लाखांची वसूली करून, तीन फ्लॅट नावावर करून घेतले तसेच आणखी 20 लाख रुपये मागणी केली.याप्रकरणी अवैध सावकारी करणाऱ्यास अटक करण्यात आले आहे.

दीपक सुर्यवंशी, रा. शिवनगरी बिजलीनगर चिंचवड या आरोपीस अटक करण्यात आले आहे.

त्याच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 386, 504, 506 सह महाराष्ट्र सावकारी कायदा 2014 चे कलम 39, 45 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सहकारी कक्ष करीत आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशान्वये सावकारी कक्ष स्थापन करून त्या संदर्भातील गुन्ह्यांचा व अर्जाचा तपासाबाबत आदेशित केले आहे. पोलीस आयुक्त यांना भेटून फिर्यादीने तक्रारी अर्ज केला असता सदर अर्जाची चौकशी सावकार कक्ष करीत असताना चौकशी अंती समजले की फिर्यादी यांचा बांधकाम व्यवसाय असून बांधकाम व्यवसाय साठी पैशांची गरज असल्याने त्यांनी आरोपी दीपक सूर्यवंशी यांच्याकडून कर्ज घेतले होते.

फिर्यादीने सन 2015 मध्ये बांधकाम व्यवसायासाठी द.मा.द.शे 10% व्याजाने 6 लाख रुपये घेतले होते. ते ठरल्याप्रमाणे फिर्यादी आणि व्याजाचे पैसे परत न केल्याने आरोपीने पिराजी यांना वारंवार फोन करून व्याजाचे पैसे न देण्याचे कारणावरून जीवे मारण्याची धमकी दिली होती.

आरोपींनी व्यास व चक्रवाढ व्याज असे एकूण 27.60 लाख रुपये वसूल करून तसेच फिर्यादी यांचे व त्यांचे वडिलांची नावे असलेले तीन फ्लॅट आरोपी आणि कागदपत्रे तयार करून बळजबरीने त्याच्या नावावर करून घेतले. तसेच पुन्हा 20 लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपी सूर्यवंशी याला पोलिसांनी 8 ऑक्टोबरला अटक केले आहे.

या आरोपी विरुद्ध यापूर्वी चिंचवड पोलीस स्टेशन मध्ये तीन गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपी दीपक सूर्यवंशी व इतरही सावकारांनी सावकारी अवैध धंदा करून कर्जदारास वेठीस धरून व्याज, चक्रवाढ व्याज वसूल करत असतील तसेच सावकाराने अवैधरित्या कर्जदाराची मालमत्ता हडप करणे, कर्जावर अवास्तव दराने व्याज आकारणे, बळाचा वापर करणे इतरही त्रास देणे सावकारी लायसन्स व्यतिरिक्त अन्य रीतीने सावकारीचा धंदा करत असेल तसेच बेकायदेशीर सावकाराचे व्यवहार करणाऱ्यांवर तक्रार देण्याचे आवाहन पोलिसांनी केलेले आहे.

सदरची कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त( गुन्हे) डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे-1 पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे पोलीस उपनिरीक्षक (श्रेणी) विजय कांबळे, पोलीस अंमलदार कल्याण महानोर, सुनील शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे यांनी केलेली आहे.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *