- October 11, 2022
- No Comment
चुकीच्या UPI वर पाठवलेले पैसे परत मिळतात का? पहा सविस्तर
UPI पेमेंटमुळे घरबसल्या पैसे देणं किंवा पाठवणं अगदी सोपं झालं आहे. डेबिट कार्ड किंवा रोख रक्कम तुम्हाला सगळीकडे घेऊन जाण्याची गरज लागत नाही. हातातल्या फोनवरूनच तुमचं काम होतं.
तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजांसाठी, लहान किंवा मोठ्या, तुमच्या फोनद्वारे पैसे देऊ शकता. कोविडदरम्यान UPI चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. Paytm, Google Pay, PhonePe आणि BHIM अॅपच्या स्वरूपात UPI वापरण्यासाठी लोकांना वेगवेगळे पर्याय देखील मिळाले. UPI युजर्सना अडचणीचा सामना करावा लागत आहे. UPI व्यवहार इतक्या वेगाने वाढले आहेत की अनेक वेळा लोक चुकीच्या UPI पत्त्यावर पैसे पाठवतात. असे झाल्यास तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चुकीच्या नंबरवर पैसे गेले तर त्याची तक्रार कुठे आणि कशी करायची याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. BHIM App काय म्हणतं? BHIM अॅपवर FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न या सेक्शनमध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं. तुम्ही जर चुकून एखाद्याला पैसे पाठवले तर ते तुम्हाला कसे मिळतील याबाबत सध्या कोणतीही सुविधा नाही. तुम्हाला ते पैसे परत मिळू शकत नाहीत.
असा कोणताही मार्ग नाही ज्याद्वारे तुम्ही स्वतः चुकीच्या खात्यात पाठवलेले पैसे परत मिळवू शकता. अॅपच्या म्हणण्यानुसार, अशा परिस्थितीत फक्त रिसीव्हरच तुमचे पैसे परत करू शकतो. म्हणूनच पैसे पाठवण्यापूर्वी नेहमी संपूर्ण तपशील तपासावा. तक्रार कुठे करायची? तुमचे पैसे परत करायचे की नाही हे पैसे ज्याला गेले आहेत त्याच्यावर आहे. चुकून असे काही घडल्यानंतर, तुम्ही UPI अॅपच्या सपोर्ट विभागात तक्रार नोंदवावी. याशिवाय, तुम्ही BHIM अॅपच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक 18001201740 वर चुकीच्या व्यवहाराची तक्रार करू शकता. बँकेशी संपर्क साधा तुम्ही चुकीच्या ठिकाणी पैसे पाठवले आहेत हे कळताच, त्या व्यवहाराचा लगेच स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर तुमच्या बँकेशी संपर्क साधा. शक्य असल्यास शाखेत भेट द्या. तुमच्या बँकेला सर्व तपशील द्या आणि लवकरात लवकर ब्रांच मॅनेजरला याबाबत माहिती द्या.
UPI आयडी नसेल तर?
समजा तुम्ही अस्तित्वात नसलेल्या UPI आयडीवर पैसे पाठवले तर अशा परिस्थितीत काय होईल. अशी परिस्थिती उद्भवल्यास, तुमचे पैसे आपोआप तुमच्या खात्यात परत येतील. त्यासाठी 48 ते 72 तासांचा अवधी लागतो.