- October 15, 2022
- No Comment
महिलेची शारीरिक संबंध ठेवून फसवणूक,आरोपी गजाआड
तळेगाव: लग्नाचे अमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवून महिलेची फसवणूक करणाऱ्यास तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केले आहे. ही महिला गरोदर असून याबद्दल कोणाला सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी या आरोपीने दिली आहे.
याबाबत पीडीत महिलेने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अक्षय भोसले, वय 23 वर्षे, रा. गुरुदत्तनगर वराळे, तालुका मावळ याला अटक करण्यात आले आहे. तसेच त्याच्या विरोधात भा.द.वि कलम 376(2)(एन), 506, बाल लैंगिक अत्याचार अधिनियम सन 2012 चे कलम 5(जे)(एल) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेले एक ते दिड वर्षांपासून आरोपी भोसले याने फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले.त्यातून फिर्यादी ह्या 7 महिन्याच्या गरोदर राहिल्या आहेत. तसेच आरोपीने फिर्यादी बरोबर शारीरिक संबंध ठेवल्याचे कोणास सांगितल्यास मारण्याची धमकीही दिली आहे.
