- October 15, 2022
- No Comment
कीरकोळ वादातुन तरुणास लोखंडी टोकदार गजाने मारहाण, आरोपी जेरबंद
चाकण: शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करून जखमी करणाऱ्यास चाकण पोलिसांनी अटक केले आहे.याबाबत जनारुल शेख हैदरअली शेख, वय 34 वर्षे, रा. मेदनकरवाडी, चाकण यांनी फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सुरज आलम नजरुल हक, रा. मेदनकरवाडी याला अटक करण्यात आले आहे.
आरोपी हा फिर्यादीच्या घरासमोर आला व फिर्यादीला म्हणाली की माझा मोबाईल नंबर तू कोणाला दिलास? आता तुझ्याकडे मी पाहून घेतो असे रागात म्हणाला. त्यानंतर शिवीगाळ दमदाटी करून त्याच्या हातातील लोखंडी टोकदार गजाने फिर्यादीच्या डोक्याच्या डाव्या बाजूस कपाळाच्या वर मारून जखमी केले आहे.