मोबाईलवरुन घरबसल्या मागवा रेशन

मोबाईलवरुन घरबसल्या मागवा रेशन

सरकारने Mera Ration app नावाचे मोबाइल अ‍ॅप आणले आहे. मोबाइल एप सरकारने सुरू केलेल्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेच्या एक भाग आहे.

Mera Ration app कसे डाउनलोड कराल ?

सर्वप्रथम आपण आपल्या मोबाइलमध्ये Google Play Store वर जा. तिथे सर्च बॉक्समध्ये Mera Ration app शोधा.

मेरा रेशन अपमध्ये नोंदणी: अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यात तुमचा रेशनकार्ड नंबर नोंदवावा लागेल. आपल्याला नोंदणीचा ​​पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यामध्ये आपला रेशन कार्ड नंबर टाकून सबमिट करा.

मेरा रेशन अ‍ॅपचे फायदे:

या मोबाईल अ‍ॅपचा फायदा नोकरीसाठी एका शहरातून दुसर्‍या शहरात जाणार्‍या बर्‍याच लोकांना होणार आहे. इतर शहरांमध्ये त्यांना रेशन दुकानांविषयी माहिती नसते, या अ‍ॅपमध्ये जवळच्या दुकानांबाबतही संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.

हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, लवकरच ते अन्य १४ भाषांमध्येही उपलब्ध होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या अ‍ॅपच्या माध्यातून दुकानातून रेशन कधी आणि कोणत्या दुकानातून घेण्यात आले ? याचीही सविस्तर माहिती मिळणार आहे.

रेशन कधी आणि किती येईल याबद्दल आपल्याला यातून संपूर्ण माहिती मिळेल. तसेच तुम्हाला किती रेशन मिळते? ही माहिती या अ‍ॅपद्वारे उपलब्ध होईल. या अॅपद्वारे आपल्या मागील व्यवहाराचा तपशील देखील आपल्याला ठाऊक होईल.

 

 

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *