मेट्रोच्या उन्नत पादचारी मार्गाचे काम सुरू, वाहतूक मार्गात बदल
- देशपुणे
- September 13, 2022
- No Comment
पणे: मेट्रोच्या उन्नत पादचारी मार्ग (स्काय वॉक) चे काम सुरु असल्याने 13 सप्टेंबर ते 14 नोव्हेबंर या कालावधीत डेक्कन पीएमटी स्टॉपकडून भिडे पुलाकडे जाणारी वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती डेक्कन वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
त्यामुळे नागरिकांनी त्यांची गैरसोय टाळण्यासाठी डेक्कन पीएमटी बस स्टॉप, गरवारे पुलावरून खंडोजी बाबा चौक, अलका टॉकीज चौक ते केळकर रोडने इच्छित स्थळी जावे. तर दुसऱ्या मार्गानुसार जंगली महाराज रोडवरून भिडे पुलाकडे जाणारी वाहने काका साहेब गाडगीळ पुल (झेडब्रीज मार्गे) पुढे जातील. अन्यथा नागरिकांना भिडे पुल येथून जंगली महाराज रोडला जाणारी वाहने भिडे पुल उजवीकडे वळून सुकांता समोरून जंगली महाराज रोडकडे नेता येणार आहेत.
हा बदल केवळ दोन महिन्यांसाठी असणार असणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.