जन्माचा दाखला (बर्थ सर्टिफिकेट) हरवलंय किंवा सापडत नाही तर घरबसल्या कसं मिळवायचं? पहा सविस्तर

जन्माचा दाखला (बर्थ सर्टिफिकेट) हरवलंय किंवा सापडत नाही तर घरबसल्या कसं मिळवायचं? पहा सविस्तर

जन्म प्रमाणपत्र हे आधार कार्ड व पॅन कार्डसारखा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्याचा उपयोग फक्त सरकारी कामातच होत नाही, तर शाळा-कॉलेजात प्रवेश मिळवण्यासाठीही होतो.

जवळचं सरकारी हॉस्पिटल, तहसील किंवा महानगरपालिका कार्यालयात जन्मदाखला मिळवू शकता. जन्माचा दाखला ऑनलाइनही काढता येतो. त्यासाठी काय करावे लागतं, ते जाणून घेऊ या.

जन्मदाखल्यासाठी पात्रता

भारतात जन्मलेली कोणतीही व्यक्ती, कोणत्याही वयोगटातल्या व्यक्ती (नवजात ते प्रौढांपर्यंत) जन्मदाखला मिळवू शकतात. आई-वडील आपल्या मुलासाठी अर्ज करू शकतात. परदेशात जन्मलेल्या भारतीय नागरिकांची मुलंही जन्मदाखला मिळवण्यास पात्र आहेत

आवश्यक कागदपत्रं

जन्म दाखला ऑनलाइन काढण्याची प्रक्रिया

स्टेप 1 : रजिस्ट्रेशन

सर्वांत आधी crsorgi.gov.in या वेबसाइटवर जा

होमपेजवर ‘General Public Sign Up’ वर क्लिक करा.

मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी भरा

ओटीपी टाकून व्हेरिफिकेशन करा.

पासवर्ड सेट करून अकाउंट बनवा.

आई-वडिलांचं आधार-कार्ड

मुलाच्या जन्माचं रुग्णालयातलं प्रमाणपत्र

आई-वडिलांचं पॅन कार्ड

रहिवासी दाखला (वीजबिल, रेशन कार्ड)

मुलाचे पासपोर्ट साइझ फोटो

आई-वडिलांचं विवाह प्रमाणपत्र

स्टेप 2 : लॉगिन करून फॉर्म भरणं

रजिस्ट्रेशन केल्यावर लॉगिन करा.

‘Apply for Birth Certificate’ वर क्लिक करा.

मूल आणि आई-वडिलांची माहिती भरा.

जन्मतारीख, जन्मठिकाण, रुग्णालयाचं नाव टाका.

आवश्यक कागदपत्रं अपलोड करा.

स्टेप 3 : फी भरणं

फॉर्म भरल्यावर फी भरा.

ऑनलाइन पेमेंट गेटवेद्वारे क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयने पेमेंट करा.

पेमेंटची स्लिप डाउनलोड करा.

स्टेप 4 : अर्जाची स्थिती

फी भरल्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन नंबर मिळेल.

या नंबरवरून तुम्ही अर्जाची स्थिती तपासू शकता.

अर्ज प्रोसेसिंगला सात ते 21 दिवस लागू शकतात.

स्टेप 5 : प्रमाणपत्र डाउनलोड करा

अर्ज स्वीकारला गेल्यावर तुम्हाला एसएमएस किंवा मेल येईल.

लॉगिन करून तुमचं डिजिटल जन्म प्रमाणपत्र डाउनलोड करा.

तुम्ही प्रिंट आउटही काढू शकता.

जन्म प्रमाणपत्र काढण्यासाठी फी:

जन्म प्रमाणपत्राची फी राज्यानुसार वेगवेगळी असू शकते. साधारणपणे ती 50 ते 100 रुपये असते. काही राज्यांमध्ये त्यासाठी कोणतीही फी नसते.

जन्मदाखला उशिरा काढण्याची प्रक्रिया

मुलाच्या जन्मापासून 21 दिवस ते एक वर्षादरम्यान जन्मदाखला काढायचा असेल तर स्थानिक रजिस्ट्रारची परवानगी लागते.

एक वर्ष ते 15 वर्षांच्या मुलाचा जन्मदाखला काढायचा असेल तर जिल्हा मॅजिस्ट्रेटची परवानगी लागते.

15 वर्षापेक्षा मोठ्या मुलाचा जन्मदाखला काढायचा असल्यास कोर्टाचा आदेश लागतो.

 

जन्मदाखल्याचे उपयोग: 

1. शाळेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक

2. पासपोर्ट काढण्यासाठी आवश्यक

3. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक

4. नोकरीसाठी आवश्यक

5. बँक अकाउंट उघडण्यासाठी आवश्यक

6. विमा पॉलिसीसाठी आवश्यक

7. लग्नाच्या नोंदणीसाठी आवश्यक

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *