पुणे: दोन वर्षानंतर गणेश विसर्जन मिरवणुक सोहळा नियमांनुसार संपन्न, मंडळाचे सहकार्य मोलाचे -पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
- पुणे
- September 11, 2022
- No Comment
पुणे: पहिल्या मानाच्या गणपतींना मिरवणुकीत उतरण्यासाठी वेळ लागला. मात्र, शेवटी मिरवणुकीचा वेळ थोड्या फरकाने लांबला असला, तरी पुण्यातील मंडळांचे सहकार्य मिळाले असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी विसर्जन मिरवणुकीसाठी 29 तास लागल्याचा दावा केला. मानाच्या गणपतींच्या विसर्जनासाठी थोडा वेळ लागला, तरी इतर सर्व गणेश मंडळांचे विसर्जन वेळेत पार पडले.
पोलिस गुरुवारी (दि.8) रात्री दहा वाजल्यापासून विसर्जन मिरवणुकीच्या कर्तव्यावर हजर होते, तर मिरवणुकीचा बंदोबस्त शनिवारी सायंकाळी पावणे पाचपर्यंत होता. पावणे पाच वाजता मिरवणूक संपल्याचे घोषित केले.ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणार्या गणेश मंडळांची पोलिसांनी नोंद घेतली आहे. दरम्यान मिरवणुकीला प्रारंभ झाल्यापासून पोलिस आयुक्त सकाळी रस्त्यावर उतरले होते.