धक्कादायक: घरात घुसून महीलेचा विनयभंग,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईम
- September 12, 2022
- No Comment
भोसरी: महिलेच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग करणाऱ्यावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी शांतीनगर, भोसरी येथे घडली.
माळआप्पा पुजारी (वय 30, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला शनिवारी सकाळी घरात एकट्या असताना सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी त्यांच्या घरात जबरदस्तीने आला. त्याने फिर्यादींसोबत गैरवर्तन करत शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच पोलिसात तक्रार दिल्यास परिसरात राहू न देण्याची धमकी दिली.
पुढिल तपास भोसरी पोलीस करीत आहेत.