पित्याने स्वतःच्याच दहा वर्षीय मुलाला केली जबर मारहाण, पित्यावर गुन्हा दाखल
- क्राईम
- September 13, 2022
- No Comment
लोणी काळभोरः नको म्हणत असतानाही खेळण्यासाठी घराबाहेर गेल्याने संतप्त झालेल्या पित्याने स्वतःच्याच दहा वर्षीय मुलाला जबर मारहाण केली.पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर 49 वर्षीय पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भादवी कलम 326 व बालक संरक्षण अधिनियम कायदा 5 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटूंब वडकी गावातील माऊली नगर येथे राहण्यास आहेत. दरम्यान, त्याचे वडील दहा वर्षांच्या मुलाला बाहेर खेळण्यास जाऊ नको असे सांगून बाहेर गेले होते.परंतु, वडील बाहेर जाताच मुलगा घरातून बाहेर खेळण्यास गेला.वडील परत आल्यानंतर त्यांना ही बाब समजली.त्यांनी रागाच्याभरात त्याला पीव्हीसी पाईपने जबर मारहाण केली. यात चिमुकला जखमी झाला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.