किरकोळ वादातून आठ जणांच्या टोळीने तरुणावर प्राण घातक हल्ला केला, आरोपीस अटक
- क्राईम
- September 13, 2022
- No Comment
पुणे: विसर्जन मिरवणुकीसाठी जात असताना धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर प्राण घातक हल्ला केला.
सिमेंटचे ब्लॉक, चाकूने मारहाण करून दगडफेक करत जखमी केल्याचा प्रकार केला.या प्रकरणी चतुश्रुंगी पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर यातील एकाला अटक करण्यात आली आहे.
सराईत शुभम अशोक गायकवाड (वय 25, रा. इंदिरा वसाहत, गणेशखिंड रोड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर त्याचे साथीदार प्रेम उर्फ ढेकण्या वाघमारे, अनिकेत पवार, नयन लोंढे, अमित साबळे, मयुर लोंढे, अदित्य वाघमारे, रोन वाघमारे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत बाजीराव विजय मोरे (वय २७, रा. गणेशखिंडे रोड, इंदिरा वसाहत) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बाजीराव मोरे हे त्यांच्या काही मित्रांसोबत वस्तीमधील गणपतीची मिरवणुक पाहण्यास जात होते.त्यावेळी पिल्लेचा धक्का लागला.त्यावरून त्यांच्यात वाद झाला.त्यानंतर या वादाचे रुपांतर भांडणात झाले.टोळक्याने आरडा ओरडा करून दहशत पसरवली.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.