बनावट हार्पिक टॉयलेट क्लिनरची बनवणारी टोळी गजाआड, तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    बनावट हार्पिक टॉयलेट क्लिनरची बनवणारी टोळी गजाआड, तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: हार्पिक टॉयलेट क्लिनरच्या नावाने बनावट मालाची विक्री केली जात असल्याचे आढळून आले आहे.चिखलीमधील तीन दुकानांवर पोलिसांनी छापे घालून बनावट हार्पिक टॉयलेट क्लिनरचा साठा जप्त केला आहे.

    याबाबत साजीद असगरअली अन्सारी (वय ३४, रा. भोसरी) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुदर्शन संजय पोवार (रा. अष्ट विनायक चौक, मोरेवस्ती, चिखली), गजेंद्र हरीराम परमार (रा. मोरे वस्ती, चिखली), महेंद्रकुमार करनाराम चौधरी (रा. शिवाजी पार्क, फुलेनगर, चिंचवड, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

    फिर्यादी हे आय पी इन्व्हेस्टीगेशन अँड डिटेक्टिव्ह सर्व्हिस या कंपनीत तपासी अधिकारी म्हणून काम करतात. सुदर्शन पवार याच्या सई बाजार दुकानात बनावट माल विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी आंगणवाडी रोडवरील दुकानात छापा टाकला. दुकानात हार्पिक टॉयलेट क्लिनर, कॉलीन ग्लास क्लिनर, लायझॉल फ्लोअर क्लिनरच्या एकूण ६ हजार ३८२ रुपयांचा बनावट माल आढळून आला.

    त्यानंतर म्हेत्रे गार्डन समोरील एम मार्ट दुकानात छापा टाकण्यात आला. या दुकानातून ६ हजार ६४० रुपयांचा बनावट माल पकडण्यात आला. त्यानंतर देव ट्रेडिंग कंपनी या दुकानातून हार्पिक लायझोल फ्लोअर क्लिअरच्या १३ हजार ४७० रुपयांचा माल पकडण्यात आला आहे. या तीनही दुकानातून २६ हजार ४९२ रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *