
धक्कादायक : दारू पिण्यास नकार दिल्याने तरुणावर तलवारीने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईमपुणे
- January 5, 2025
- No Comment
भोसरी (पुणे): दारू पिण्यास नकार दिल्याने एका तरुणावर दोन जणांनी तलवारीने वार केले. ही घटना बुधवारी (दि. १) मध्यरात्री एक ते तीन वाजताच्या दरम्यान गुळवेवस्ती, भोसरी येथे घडली.
अनुज फेबीयनके अे. (वय २८, रा. ॲन्टलॉन सिटी, दापोडी पोलीस ठाण्याच्या मागे, दापोडी) आणि गुरूदीप भाटीया (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
नवप्रितसिंग अजितसिंग संदुक (वय २७, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी गुरुवारी (दि. २) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या गुळवे वस्ती, भोसरी येथील वर्कशाॅपमध्ये दोन्ही आरोपी दारू पित होते. त्यांनी फिर्यादी यांना दारू पिण्यास सांगितले. मात्र त्यांनी दारू पिण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी फिर्यादी संदुक यांना मारहाण केली. आरोपी अनुज हा फिर्यादीच्या छातीवर बसून हाताने मारहाण करीत होता. त्यावेळी आरोपी गुरुदीप याने तलवारीने हातावर वार करून जखमी केले.
भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.





