धक्कादायक! सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्या

    धक्कादायक! सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्या

    पिंपरी-चिंचवड: सावकाराच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली. राजू नारायण राजभर असे आयुष्य संपवलेल्या तरुणाचे नाव असून आत्महत्येआधी त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करत तसेच चिठ्ठी लिहीत चार जणांच्या त्रासाला कंटाळून मी जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.

    https://youtu.be/FOjpC6AhM_M?si=wMmRVl73T67jki7D

    याबाबत सविस्तर माहिती अशी की, मला मानसिक आणि आर्थिक त्रास देणाऱ्या बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे, मला माफ करा. असं भावनिक आव्हान करत राजू नारायण राजभर या तरुणाने चिंचवड येथील साईनगर भागातील आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

    रजनी सिंग, राजीव कुमार उर्फ गुड्डू भैया, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे उर्फ अविनाश गुंडे या चार बेकायदेशीर सावकाराच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय घेत आहे. असा व्हिडिओ तयार करत आणि सुसाईड नोट लिहत राजू राजभर या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे.

    मला मारायच्या धमक्या येत होत्या, तुझ्या मुलांना उचलू, असे आरोपी म्हणत होते. मला घरातून किंवा बाहेरुन कोणताही सपोर्ट मिळाला नाही, त्यामुळेच मी हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे या रिक्षा चालकाने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. मी माझ्या बायकोची, माझ्या मुलीची क्षमा मागतो, असंही तो या व्हिडिओमध्ये म्हणतो.

    ‘माझ्या छोट्या मुलीला सांभाळा, माझ्या अंत्यसंस्कारासाठी माझ्या पत्नीकडे पैसे नसल्याने मला इलेक्ट्रॉनिक भट्टीमध्ये जाळा असं अत्यंत भावनिक आव्हान देखील राजू राजभर या तरुणाने केला आहे. आता या प्रकरणात निगडी पोलिसांनी रजनी सिंग, राजीव कुमार, महादेव फुले आणि हनुमंत गुंडे या चार आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *