शिवाजीनगर:किरकोळ वादातून तिघांवर वार,आरोपी गजाआड

शिवाजीनगर:किरकोळ वादातून तिघांवर वार,आरोपी गजाआड

शिवाजीनगर: भांडणाच्या रागातून कारागृहातून सुटून आल्यानंतर टोळक्याने तिघांवर खुनी हल्ला करून गंभीररित्या जखमी केले. ही घटना 2 सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास शिवाजीनगरमधील पाटील इस्टेट परिससरात घडली.

याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तौसिफ उर्फ अमन दस्तगीर शेख (22), अल्ताफ मोहमंद शेख (वय 20 दोघेही रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचे पाच ते सहा साथीदार फरार आहेत. विकास सावंत, विकी लोखंडे आणि अजय लोखंडे अशी जखमींची नावे आहेत. उमेश सावंत (32) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश आणि त्यांचे भाऊ विकास हे 2 सप्टेंबरला रात्री अकराच्या सुमारास मित्रांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या टोळक्याने भांडणाच्या रागातून विकास, विकी आणि अजय यांच्यावर शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले. त्याशिवाय अजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केली. धारधार शस्त्रे हवेत फिरवून हम जेल काट कर आये है, हमारा कोई बाल बाका नही कर सकता, अशी धमकी देउन परिसरात दहशत निर्माण केली.

पुढील तपास उपनिरीक्षक मोहन साळवी करीत आहेत.

Related post

पुणे शहरात जमाव, मिरवणूक व निदर्शनांवर निर्बंध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३९ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे शहरात जमाव, मिरवणूक व निदर्शनांवर निर्बंध महाराष्ट्र पोलीस…

पुणे: पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३९ (१)(२)(३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश…
हडपसरमधील कळेपडळ अंडरपास अपघात — निष्काळजीपणाची जळती हकीकत

हडपसरमधील कळेपडळ अंडरपास अपघात — निष्काळजीपणाची जळती हकीकत

पुणे हडपसर :हडपसरमधील महत्त्वपूर्ण कळेपडळ अंडरपासवरील उंचीबंदी अचानक कोसळल्याने एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली, आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उठली आहे. ही…
पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून १५ लाख रुपये किंमतीच्या ३७ दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त

पिंपरी चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या परिमंडळ एक मधील वाहन चोरी विरोधी विशेष पथकाने वाहनचोरी करणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला आहे. १५ लाख…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *