पीएमपीएल बस चालकाचा निष्काळजी पणा, भरधाव वेगात पादचाऱ्याला धडक दिल्याने पादचारी जागीच ठार
- क्राईम
- September 9, 2022
- No Comment
कासारवाडी: पीएमपीएल बसने पादचाऱ्याला धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत ताराचंद राठोड, (वय 53, रा. ता. पडेगाव, जि. औरंगाबाद, मूळ रा. कोळवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जावेद शेख (वय 50, रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड) यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या भावाचा मुलगा उमेश राठोड (वय 22, सध्या रा. आकुर्डी मूळ रा.कोळवाडी, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) हा 3 सप्टेंबरला रात्री 11.30 च्या सुमारास तो काम करीत असलेल्या हॉटेल कलासागर, कासारवाडी येथून त्याच्या आकुर्डी येथील रूमवर जात होता.त्यावेळेस बी.आर.टी. रोड क्रॉस करीत असताना पीएमपीएल बसच्या चालकाने त्याच्या ताब्यातील बस वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने चालवून उमेश राठोड याला धडक दिली. या अपघातात उमेशच्या डोक्याला गंभीर जखम झाली आणी त्यात त्याचा मृत्यू झाला.