कर्जासाठी जामीनदार झालेत,मग हे नक्की वाचा!

कर्जासाठी जामीनदार झालेत,मग हे नक्की वाचा!

जर तुम्ही दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहत असाल तर सावधान. वित्त पुरवठा करणाऱ्या अनेक बँका ,संस्थामध्ये जामीनदार अनिवार्य असून कर्ज घेणारे खातेदार आपले नातेवाईक किंवा मित्र यांना जामीनदार म्हणून सादर करताना दिसतात. अनेकदा आपण एखाद्या मित्राचे, शेजाऱ्याचे किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या कर्जाचे जामीनदार राहतो. जोपर्यंत कर्जदार व्यक्ती त्याच्या कर्जाचे हप्ते नियमित फेडत असतो,तोपर्यंत तुम्हाला कसलीच काळजी नसते. अर्जदार नियमित परतफेड करत असेल तर बहुतेक वेळा आपण विसरूनही जातो की आपण या कर्जाचे जामीनदार होतो. पण जर कर्जदाराने कर्ज फेडण्यात कसूर केली तर मग तुम्हाला अडचणींना तोंड द्यावे लागेल.

इं’डियन कॉ’न्ट्रॅक्ट ॲ’क्ट नुसार जामीनदार या कर्जाचा पर्यायी देणे दार नसून तो कर्जाचा भागीदार असतो. म्हणून कर्ज फेडण्याची जबाबदारी जेवढी कर्जदाराची आहे तेवढीच ती जामीनदाराची सुद्धा आहे.असे हा कायद्या मद्ये नमुद केले आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या कर्जाचे जामीन असता तेव्हा त्यात तीन पक्ष संबंधित असतात. कर्ज घेणारा, बँक आणि जामीनदार. परिणामी जमीनदाराची जोखीम थोडीही कमी होत नाही तो एक प्रकारे सहकर्जदार असतो.जामीनदार यांचा हा मोठ्या गैरसमज आहे की.आपला या कर्जा मद्ये काहीही संबंध नाही पुढे कर्जदार व बँक बघून घेतील” पण जामीन राहणे हे तुम्हाला महागात पडू शकते.

दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा फरक पडतो तो तुमच्या “सिबिल ” च्या अहवालात सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो( इंडिया) लिमिटेड भारतातील जवळपास सर्व छोट्या मोठ्या बँका या संस्थेला त्याच्या थकीत कर्जदाराच्या याद्या पुरवीत असतात. त्यामुळे कर्जबुडयाची पूर्ण माहिती अन्य बँकांनाही होऊ शकते.पुढे कुठलेही कर्ज देताना कुठलीही बँक तुमचा हा सिबिल अहवाल तपासूनच तुम्हाला कर्ज देत असते. अगदी नियमित आणि अनियमित कर्ज फेडणार यांची सुद्धा पूर्ण कुंडली येथे असते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही जामीनदार असलेली व्यक्ती कर्जाचे हप्ते बरोबर फेडत नाही तेव्हा त्याचे नाव या काळया यादीत जातेच.

पण त्याच्याबरोबर जामीन दाराचे ही नाव तेथे नमूद होते. कारण कायद्यानुसार जामीनदार हा त्याचा सह कर्जदार असतो. त्यामुळे तुम्हाला गरज भासली आणि तुमच्या गरजेसाठी कर्ज घेण्यास जाता, तेव्हा तुम्ही काहीही न करता तुमचे सिबिल रिपोर्ट खराब असल्यामुळे तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल.तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योजलेल्या योजनांना अचानक सुरूंग लागतो कारण कर्जदार जेव्हा ते पूर्ण कर्ज फेडेल किंवा तितक्या तोलामोलाचा दुसरा जामीनदार आणेल व बँक परवानगी देईल तरच तुमची या प्रकरणातून सुटका होणे शक्य असते. ही तीन पक्ष गुंतवून असल्यामुळे अतिशय किचकट प्रक्रिया आहे.

जामीनदार म्हणून राहताना तुम्ही कोणती काळजी घ्याल?:

१.साधारणतः गॅरंटी आणि परिचय नसलेल्या व्यक्तींचे अजिबात जामीनदार राहू नका.

२.कर्जदाराने पुरेशी मालमत्ता तारण ठेवली आहे का ते तपासून घ्या. अपुऱ्या तारण कर्जाचे जामीन राहण्यास शक्यतो टाळा.

३.त्या कर्जाचा इन्शुरन्स काढता येतो का ते पहा आणि तो काढण्याचा आग्रह धरा, जेणेकरून तुमची जोखीम कमी होईल.

Related post

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जामीन मंजूर 

    पुणे; खून प्रकरणात कलम ३०२, २०१ आरोपी गुन्हा कबुलीचे निवेदन असताना आरोपी नामे अब्दुला उर्फ बबलू सरदार यास जिल्हा…
मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या  तरुणीवर रात्री गँगरेप

मित्राबरोबर फिरायला बोपदेव घाटात गेलेल्या तरुणीवर रात्री गँगरेप

लुटमारीच्या घटना कायम होत असतात, परंतु मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर तिन जणांनी बलात्कार केल्याची गंभीर घटना काल रात्री घडली. या…
घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे उघड गुन्हे शाखा युनिट ६ ची कारवाई

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद ! घरफोडीचे ०३ गुन्हे…

गुन्हे शाखा युनिट-६ कडील पथक युनिट हद्दीत गुन्हे प्रतिबंधात्मक व गुन्हेगार चेकिंग पेट्रोलिंग करित असताना युनिटकडील अंमलदारास मिळालेल्या गुप्त बातमी वरुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *