जमीन खरेदीचा व्यवहार, धनादेश बाउन्स करून पैसे न देता केली तीन कोटींची फसवणूक

जमीन खरेदीचा व्यवहार, धनादेश बाउन्स करून पैसे न देता केली तीन कोटींची फसवणूक

हिंजवडी: जमीन खरेदीचा व्यवहार करून त्या व्यवहाराचे संपूर्ण पैसे न देता तीन कोटी 10 लाख रुपयांची फसवणूक केली.ही घटना 13 एप्रिल 2016 ते 11 सप्टेंबर 2022 या कालावधीत नेरे दत्तवाडी हिंजवडी येथे घडली.

शांताराम दत्तात्रय कुदळे (वय 61, रा. नेरे, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार साईरंग डेव्हलपर्स अँड प्रमोटर्सचे मालक के. आर. मलिक, मोहम्मद बिन शाहरुख (दोघे रा. हिंजवडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुदळे कुटुंबीयांची मिळकत सैरंग डेव्हलपर्स अँड प्रमोटर्स प्रा ली चे मालक के. आर. मलिक आणि त्यांचा मुलगा मोहम्मद बिन शाहरुख यांनी खरेदी केली.त्या व्यवहारातील एक कोटी 60 लाख रुपये रक्कम आरोपींनी कुदळे यांना दिली.उर्वरित तीन कोटी 10 लाख रुपये देण्यासाठी आरोपींनी धनादेश दिले.मात्र ते धनादेश बाउन्स करून पैसे न देता फसवणूक केली.

पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

 

Related post

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌ गुंठेवारी खरेदी-विक्रीस मिळवा परवानगी; आसा करा अर्ज

गुंठेवारी खरेदी-विक्रीचा मार्ग मोकळा! ५ टक्के शुल्क भरा अन्‌…

सर्वसामान्‍य नागरिकांनी खरेदी केलेल्‍या एक, दोन, तीन किंवा चार-पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्‍यास प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे. त्यासाठी पूर्वी…
तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमचं वीजबील जास्त येतंय? करा हा उपाय!

तुमची वीजबिले कधी कल्पनेपेक्षा जास्त आली आहेत का? वीज वाचवत असूनही जास्त बिल येत असेल तर तुमच्या वीजमीटरमध्ये काहीतर गडबड किंवा…
महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणची लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना

महावितरणने ऑनलाइन वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढवण्याच्या हेतूने लकी ड्रॉ डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *