बावधन येथे महिलेला गळ्यातली सोनसाखळी हिसकावली
- क्राईम
- September 13, 2022
- No Comment
बावधन: बावधन येथे महिलेला शतपावली करणे चांगलेच महागात पडले आहे. कारण शतपावली करत असताना चोरट्यांनी महिलेला कानाखाली चापट मारून गळ्यातली सोनसाखळी हिसकावली आहे. ही घटना शनिवारी (दि.10) रात्री पावणेअकराच्या सुमारास बावधन येथील मार्केटयार्ड परिसरात घडली आहे.
याप्रकरणी महिलेने रविवारी (दि.11) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तीन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या रात्री जेवणांनंतर शतपावली करत होत्या यावेळी आरोपी दुचाकीवरून पाठी मागून आले, त्यांनी थेट फिर्यादीच्या कानाखाली चापट मारून त्यांनी ढकलून दिले. यावेळी फिर्यादी यांच्या काही लक्षात येण्या आधीच चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 60 हजार रुपयांची 15 ग्रॅम वजनाची सोन साखळी हिसकावून नेली.यावरून हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.