प्रेम प्रकरण असल्याचा संशय घेत महिलेला मारहाण, आरोपी गजाआड
- क्राईम
- September 13, 2022
- No Comment
वाकड: घरात घुसून कमरेच्या बेल्टने महिलेला मारहाण करणाऱ्याला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रहाटणी येथे घडली.
पप्पू उर्फ सुनील बबन भोसले (वय 39), एक महिला आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस महिलेचे प्रेम प्रकरण असल्याचा संशय घेत आरोपी महिला आणि अल्पवयीन मुलाने फिर्यादी महिलेच्या घरात घुसून तिला कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. आरोपी पप्पू याने फिर्यादीचा पाठलाग करून तिला फोन करत शिवीगाळ करून विनयभंग केला. पोलिसांनी पप्पू याला अटक केली आहे.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.