पुर्व वैमनस्यातून हॉटेल व्यावसायिकाला दगडाने मारहाण, तीन टाळक्यां विरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईम
- September 13, 2022
- No Comment
मावळः मावळमधील आंबी येथे किरकोळ कारणावरून एका हॉटेल व्यावसायिकाला तिघांनी दगडाने मारहाण करत,हॉटेलची तोडफोड केली आहे.
ऋषिकेश राजेश उन्हाळे (वय 22 रा.वराळे) यांनी एमआयडीसी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून विकास भिसे (वय 32 रा.तळेगाव दाभाडे) व त्याचे 23 ते 25 वयाचे दोन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी भिसे हा सेक्युरेटी गार्ड असून फिर्यादी सोबत दहा दिवसांपूर्वी भाडेतत्त्वावर एकत्र घेतलेली रुम सोडल्याचा राग त्याच्या मनात होता.याच कारणावरून फिर्यादी त्यांच्या हॉटेलच्या दरवाज्यात उभे असताना त्याच्या साथीदारासह आला, त्याने वाद घालण्यास सुरुवात केली व फिर्यादीस दगड मारून गंभीर जखमी केले.तसेच हॉटेलच्या दरवाज्यावर दगड मारून तोडफोड केली.ह़ॉटेलच्या दारात उभी असलेल्या ग्राहकाच्या गाडीची मागची काच फोडून गाडीचेही नुसकान केले. यावरून एमआयडीसी तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.