देहू: चोरट्यांचा धुमाकुळ, घराचे कुलूप तोडून घरफोडी, पंच्यानव हजार लंपास
- क्राईम
- September 13, 2022
- No Comment
देहू: घराचे कुलूप तोडून घरफोडी, चोरट्याने घरातील रक्कम व दागिन्यावर हात साफ केला. सदर घटना आदर्शनगर, किवळे येथे घडली.
अबिदअली इलाही अलीसाहब मुलतानी (वय 32, रा. आदर्शनगर, किवळे) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांची पत्नी घराला कुलूप लावून लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातून 80 हजार 50 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 95 हजार 50 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.