मुंबई – पुणे महामार्गावर ट्रकचा ब्रेक फेल आणि नऊ गाड्यांचा लागोपाठ अपघात
- देश
- September 13, 2022
- No Comment
मुंबई – पुणे: द्रुतगती महामार्गावर किलोमीटर 39/800 च्या दरम्यान सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबई लेनवर मल्टी एक्सल वाहनांचा अपघात झाला.
त्यामध्ये वॅगनर (MH 12 TV7907), वॅगनर (MH 14 EC 2767), हुंडाई (MH 14 HG 5092), हुंडाई (MH 04 HN 0429), स्विफ्ट (MH 46 AP 0616), कार (MH 12 LD 2055), कार (MH 47 AU 2737) , एसटी (MH 14 BT 4698) , ट्रक (MH 46 AF 9160) ही नऊ वाहने बाधित झाली आहेत.सुदैवाने या अपघातात कोणी जखमी अथवा मृत झाले नाही.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, MH 46 AF 9160 या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने त्याने समोर जाणार्या कारला धडक दिली. ती कार समोरच्या कारवर अशा प्रकारे नऊ गाड्या एकमेकाला धडकल्या. सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही. अपघातात आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स यांनी मदत केली.बोरघाट वाहतूक पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन वाहतूक सुरळीत केली.हा अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला आहे.
पुढील तपास खोपोली पोलीस स्टेशनचे निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.