पुणे सोलापूर रस्त्यावर भरधाव वेगात कंटेनरने दुचाकीला जोराची दिली धडक ,भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू तर पती आणि मुलगी गंभीर जखमी
- देश
- September 13, 2022
- No Comment
हडपसर: पुणे सोलापूर रस्त्यावर दुचाकीने जाणाऱ्या एका दाम्पत्याला भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने जोराची धडक दिली.या भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती आणि मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.
पुणे – सोलापूर रोडवरील लक्ष्मी कॉलनीसमोर हा अपघात झाला आहे. वर्षाराणी राहुल बोरावके (वय ३६) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, मुलगी समृद्धी बोरावके (वय१५) ही जखमी झाली आहे.याप्रकरणी राहुल बोरावके (वय ४४) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी कंटनेर चालक किरण रामकृष्ण सानप (वय २२, रा. पाटोदा. जि. बिड) याला अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हे दुचाकीवरून पत्नी व मुलीला घेऊन जात होते.यादरम्यान, लक्ष्मी कॉलनीसमोर आल्यानंतर इन हॉटेलसमोर मागून आलेल्या भरधाव कंटनेरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.यात गंभीर जखमी झाल्याने वर्षाराणी यांचा मृत्यू झाला. तर, समृद्धी ही गंभीर जखमी झाली असून, तिच्या पायाला जबर मार लागला आहे.
पुढील तपास पोलीस करत आहेत.