चारचाकी थांबवून सोनसाखळी हिसकावली, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईम
- September 15, 2022
- No Comment
वाकड: वाकड येथे कारला हात दाखवून थांबवले व त्यानंतर कार चालकाची सोनसाखळी हिसकावली.ही घटना भूमकर चौकात घडली.
याप्रकरणी दिपक नथ्थु पाटील (वय 26 रा.वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे त्यांच्या मित्राला भूमकर चौकातील सीसीडी येथे सोडून जात होते. यावेळी ते सबवेजवळ गेले असता दुचाकीवरील आरोपींनी त्यांना हाताने थांबण्याचा इशारा केला. फिर्यादी यांनी गाडी थांबवून गाडीची काच खाली केली असता आरोपीने फिर्यादीच्या गळ्यातील 16.19 ग्रॅम वजनाची 48 हजार 570 रुपयांची चेन हिसकावली.यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.