थेऊर येथे देशी विदेशी दारूची वाहतूक करणारी संशयित कार लोणी काळभोर पोलिसांनी पकडली

    थेऊर येथे देशी विदेशी दारूची वाहतूक करणारी संशयित कार लोणी काळभोर पोलिसांनी पकडली

    लोणी काळभोर: देशी विदेशी मद्याची अनधिकृत वाहतूक करणारी एक संशयित कार लोणी काळभोर पोलिसांनी थेऊर (ता. हवेली) परिसरात सोमवारी (ता. 30) दुपारच्या सुमारास पकडली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी कारसह मद्याचा साठा ताब्यात घेतला आहे.

    मद्यानी भरलेली कार सोडावी म्हणून अनेक राजकीय नेत्यांसह प्रतिष्टीत नागरिकांचे पोलिसांना फोन आले आहेत. मात्र, पोलिसांनी दारूची बिले दाखविल्याशिवाय कार सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. तर या पकडलेल्या मद्याचा पुरवठा एका बारला 31 डिसेंबरसाठी होणार होता. तसेच यामध्ये नायगाव मधील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

    दरम्यान, राजकीय नेत्यांनी मद्याने भरलेली कार सोडून देण्यासाठी पोलिसांवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे ही अनधिकृत मद्याची वाहतूक असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी. अन्यथा कागदपत्रे व पुरावे तपासून सोडून द्यावी. अशी मागणी नागरिकांकडूनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *