मोठी बातमी! हॉटेल्स असोसिएशनचा मद्यपींसाठी महत्वाचा निर्णय, ड्रिंक जास्त झाल्यास हॉटेल चालक सोडणार घरी

    मोठी बातमी! हॉटेल्स असोसिएशनचा मद्यपींसाठी महत्वाचा निर्णय, ड्रिंक जास्त झाल्यास हॉटेल चालक सोडणार घरी

    पुणे: शहरासह सर्वच ठिकाणी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, पब चालकाकडून मोठी तयारी करण्यात आली आहे. अस असलं तरी ३१ डिसेंबरच्या रात्री पार्टी करून ड्रिंक पिऊन अनेकवेळा ड्रिंक अँड ड्राईव्हच्या घटना घडत असतात.

    याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील हॉटेल्स असोसिएशनच्या वतीने एक नियमावली बनविण्यात आली आहे. आज ३१ डिसेंबरला पार्टी केल्यावर ड्रिंक जास्त झाल्यास हॉटेल चालकच अशा व्यक्तींना स्वतः च्या पैशाने ओला उबेर करून घरी सोडणार आहेत, अशी माहिती हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी दिली आहे.

    नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलिसांकडून देखील कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज ३१ डिसेंबर रोजी जवळपास ३ हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अशातच आता हॉटेल्स वाल्यांनी देखील खबरदारी घेतली आहे. शासनाकडून आज ३१ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

     

    याबाबत बोलताना हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी म्हणाले की, सर्वप्रथम आम्ही शासनाला धन्यवाद देतो की त्यांनी पहाटे ५ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवण्याच निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसारच आम्ही पाच वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवणार आहोत. तसेच खबरदारी म्हणून आम्ही एखाद्या व्यक्तीने जास्त ड्रिंक केली तर त्याला सर्व्ह करण्याचं बंद करू तसेच त्यांच्या ग्रुप मधील लोकांना देखील आम्ही सांगणार आहोत, की यांना आता तुम्ही थांबवा तसेच आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की, त्या दिवशी कोणीही वादविवाद करू नये.

    तसेच आम्ही आमच्या ग्रुप मधील ओला उबेर कार चालकांना देखील सांगितल आहे की, उद्या रात्री एक ते दीड नंतर आपण तयार रहा कारण एखाद्या व्यक्तीने जास्त ड्रिंक केली तर त्याला आम्हीच ओला कारने घरी सोडणार आहोत. मग जरी त्यांनी त्यांची दुचाकी किंवा कार आणली असेल तरी आम्ही त्यांना घरी सोडणार आहोत.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला; दोघे अटकेत

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची घटना हडपसर परिसरातील रामटेकडी येथे घडली आहे. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *