कात्रज घाटामध्ये गोळीबाराचा थरार,तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू

    कात्रज घाटामध्ये गोळीबाराचा थरार,तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू

    पुणे: कर्जबाजारी झाल्याने तरुणाने पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना कात्रज भागात घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    दीपक राजू लकड (वय ४२) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी दिली. 

     

    कात्रज घाटात सोमवारी रात्री दहाच्या लकड हे जखमी अवस्थेत पडल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. कात्रज घाटात चोरट्यांनी अडविले. पैसे न दिल्याने चोरट्यांनी पिस्तुलातून गोळीबार केल्याची माहिती लकड यांनी पोलिसांना दिली.

     

    त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कात्रज घाटातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. लकड यांनी दिलेली माहिती संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीत कर्जबाजारी झाल्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती त्याने दिली. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लकड यांनी बाळगलेले देशी बनावटीचे पिस्तूल कोठून आणले, यादृष्टीने तपास सुरू आहे, असे पोलीस निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला; दोघे अटकेत

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची घटना हडपसर परिसरातील रामटेकडी येथे घडली आहे. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *