पुणे स्टेशन वर चोरट्यांचा धुमाकुळ चालुच,गुंगीचे ओैषध वापरुन तरुणाचे ४३ हजारांची रोकड केली लंपास

    पुणे स्टेशन वर चोरट्यांचा धुमाकुळ चालुच,गुंगीचे ओैषध वापरुन तरुणाचे ४३ हजारांची रोकड केली लंपास

    पुणे: पुणे स्टेशन परिसरात तरुणाला लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी गुंगीचे ओैषध असलेला रुमाल तरुणाच्या चेहऱ्यावर लावून त्याच्याकडील ४३ हजारांची रोकड चोरुन नेली आहे.

    दोन दिवसांपूर्वीच स्टेशन परिसरात रिक्षाचालक आणि साथीदारांनी चाकणणधील एका तरुणाला लुटल्याची घटना घडली होती. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मूळचा अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी गावचा रहिवासी आहे. तो कामानिमित्त गुरुवारी (२ डिसेंबर) पुण्यात आला होता. स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळ परिसरात तो बसची चौकशी करत होता. त्यावेळी दोन चोरट्यांनी त्याला गाठले. गुंगीचे ओैषध असलेला रुमाल त्याच्या चेहऱ्यावर लावला. रुमाल लावल्यानंतर तरुणाला गुंगी आली. चोरट्यांनी तरुणाच्या खिशातील ३३ हजारांची रोकड, तसेच डेबीट कार्ड काढून घेतले. त्यानंतर चोरट्यांनी डेबीट कार्डचा गैरवापर करुन त्याच्या खात्यातून दहा हजारांची रोकड चोरुन नेली.

    पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ तपास करत आहेत.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *