पिंपरी चिंचवडमध्ये खासगी बस जळून खाक; सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही

    पिंपरी चिंचवडमध्ये खासगी बस जळून खाक; सुदैवाने कोणतीही जिवितहानी नाही

    पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास खासगी बस जळून खाक झाल्याची मोठी दुर्घटना घडली. पण बस चालकाच्या प्रसंगावधनामुळं प्रवासी थोडक्यात बचावले.

    मिळालेल्या माहितीनुसार, डांगे चौक ते औंध मार्गावर जगताप डेअरी चौकात ही घटना घडली.

    या घटनेत बसचा मागील भाग संपुर्ण जळून खाक झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. चालकाने वेळीच गाडी थांबवली आणि प्रवाश्यांना खाली उतरवले.

    अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखेड वरून भोसरीच्या दिशेने खासगी आराम बस येत होती. ही बस जगताप डेअरी जवळ आल्यावर बसमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी बस मध्ये सात प्रवासी होते. चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही वेळेतच संपूर्ण बसने पेट घेतला. याबाबत पिंपरी चिंचवड अग्निशामक दलास माहिती मिळाल्यावर रहाटणी येथील बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यांनी बसला लागलेली आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *