लज्जास्पद! ३ वर्षीय मुलीवर केला नराधम बापानेच केला लैंगिक अत्याचार,बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

    लज्जास्पद! ३ वर्षीय मुलीवर केला नराधम बापानेच केला लैंगिक अत्याचार,बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

    नवी मुंबई: मुंबईत लेक आणि बापाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडलीय. ३ वर्षाच्या पोटच्या मुलीवर बापानं लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडलाय. पीडित मुलीवर नराधम बापानं अत्याचार केला असून, ही बाब पीडित आईला समजताच तिनं बापाला जाब विचारला.

    मात्र, बापानं आईला शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. हा किळसवाणा प्रकार उघडकीस आल्यानंतर, पोलिसांनी नराधम बापाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अटक करण्यात आलंय.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना नवी मुंबईच्या घणसोली रोड परीसरात घडली आहे. २६ डिसेंबरला पीडित तीन वर्षीय मुलगी घरात एकटी होती. आरोपी पित्यानं आपल्या पोटच्या मुलीसोबत अश्लील आणि लैगिंक चाळे केले. नंतर जबरदस्तीनं लैगिंक अत्याचार केला. ही धक्कादायक माहिती मुलीनं आपल्या आईला दिली.

    पीडितेच्या आईला ही बाब लक्षात येताच तिला धक्काच बसला. तिनं मुलीला आणखीन विचारपूस केली असता, बाप गेले अनेक दिवसांपासून हे काळं कृत्य करत असल्याचं समोर आलं. यानंतर पीडित मुलीच्या आईनं घृणास्पद कृत्याबद्दल बापाला जाब विचारला. मात्र, नराधम बापानं आईला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली. याच जाचला त्रासलेल्या महिलेनं तातडीने रबाळे पोलीस ठाणे गाठले.

    रबाळे पोलीस ठाणे गाठुण तिनं सगळी माहिती सांगत नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार रबाळे पोलिसांनी अधिक तपास करीत आरोपी बापाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी रबाळे पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास करण्यात येत असून, नराधम बापाला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी सामान्य जनतेकडून व्यक्त होत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *