थेऊर गोळीबार, खुन प्रकरणातील दोन फरार आरोपी गजाआड

    थेऊर गोळीबार, खुन प्रकरणातील दोन फरार आरोपी गजाआड

    थेऊर (पुणे): लघुशंका करत असलेल्यांना हटकल्याने गोळीबार करुन दगडफेक केल्याने जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा मृत्यु झाला होता. या प्रकरणात लोणी काळभोर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन तिघांना त्याचवेळी पकडले होते.

    त्यावेळी पळून गेलेल्या तिघांपैकी दोघांना दरोडा व वाहन चोरी पथकाने पकडले.

    मयुर शंकर जाधव (वय ३२, रा. कुरुळी बांदल वस्ती, ता. खेड), प्रथमेश ऊर्फ सोन्या आनंदा वाहिले (वय २३, रा. केळगाव, चिंबळी, आळंदी रोड, ता. खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    थेऊर रोडवरील जय मल्हार हॉटेलजवळ लघुशंका करत असलेल्या ६ ते ७ जणांना तेथील सुरक्षा रक्षक अक्षय चव्हाण यांनी हटकले होते. तेव्हा टोळक्यांमधील अजय मुंढे याने आपल्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. चव्हाण पतीपत्नीवर दगडफेक केली. त्यात शीतल अक्षय चव्हाण (वय २९) या दगड लागल्याने जखमी झाल्या होत्या. उपचार सुरु असताना त्यांचा बुधवारी मृत्यु झाला. त्यामुळे पोलिसांनी खुनाचे कलम वाढविले आहे. या घटनेनंतर पळून जाणार्‍या तिघांना पोलिसांनी पकडले. सतीश बारीकराव लोखंडे, अजय दशरथ मुंढे, भानुदास दत्तात्रय शेलार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यावेळी तिघे जण पळून गेले होते. पळून गेलेल्यांचा पोलीस शोध घेत होते. दरोडा व वाहन चोरी पथकाला त्यांच्याबाबत माहिती मिळाली़ त्यावरुन पोलिसांनी मयुर जाधव व प्रथमेश वाहिले यांना खेड शिवापूर येथून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्यांना लोणी काळभोर

    पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

    ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिडवई, वाहिद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिनकर लोखंडे, राजेश लोखंडे, पोलीस अंमलदार गणेश ढगे, प्रदीप राठोड, सुहास तांबेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, महेश पाटील, संदीप येळे, विनायक येवले, समीर पिलाणे, गणेश डोंगरे, नितीन धाडगे यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *