सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या; महिलेसह चार जणांवर गुन्हा

    सावकाराच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या; महिलेसह चार जणांवर गुन्हा

    पुणे: सावकारी व्याजाच्या विळख्यात अडकलेल्या एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. 3) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील साईबाबा नगरमध्ये घडली.

    राजू राजभर (45) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा गणेश राजू राजभर (19) यांनी शुक्रवारी (दि. 3) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हनुमंता ऊर्फ अविनाश गुंडे, महादेव फुले, गुड्डु भैया आणि महिला आरोपी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचीनावे आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश यांचे वडील राजू राजभर हे रिक्षा चालवितात. त्यांनी आरोपींकडून हातउसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करूनदेखील शिल्लक असलेल्या व्याजाची रक्कम परत न केल्याच्या कारणावरून आरोपींनी घरात घुसून तुला मारू, तुला कापून टाकू, अशा वारंवार धमक्या दिल्या. या धमक्यांमुळे ते सतत तणावात होते. तणाव असह्य झाल्याने त्यांनी शुक्रवारी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

    राजू राजभर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईमध्ये एक व्हिडिओ तयार केला. त्यामध्ये आपण का आत्महत्या करीत आहोत, याबाबस सविस्तर सांगितले. व्हिडिओच्या शेवटी त्यांनी आत्महत्या करीत असल्याबाबत आपली पत्नी, मुलगा व मुलीची माफीही मागितली. तसेच, दोन पानांची चिठ्ठीही लिहिली आहे.

     

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *