
कीरकोळ वादात सिमेंटचा गट्टु डोक्यात मारुन खुन;लोणी काळभोरमधील धक्कादायक घटना
- क्राईमदेशपुणे
- January 5, 2025
- No Comment
पुणे: दारुला पैसे देत नाही आणि स्वत:मात्र दारु पित बसतो, सारखा त्रास देतो, धमकी देतोस या कारणावरुन डोक्यात सिमेंट गट्टु मारुन एकाचा खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अकस्मात मृत्युचा तपास करताना हा प्रकार उघड झाल्याने लोणी काळभोर पोलिसांनी २० दिवसानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
योगेश लक्ष्मण काळभोर (वय ४५) असे खुन झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी नटु ऊर्फ पोपट लक्ष्मण म्हात्रे (वय ३९, रा. मातंग वस्ती, लोणी काळभोर) याला अटक केली आहे.
लोणी काळभोर येथील दत्तात्रय सखाराम कांबळे याच्या खोलीत १५ डिसेबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली होती. पोलिसांनी त्यावेळी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती.
त्याचा तपास करताना पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सोमनाथ किसन जाधव, दत्तात्रय सखाराम कांबळे यांची पत्नी संगीता दत्तात्रय कांबळे यांच्याकडे चौकशी केली. त्यात सोमनाथ जाधव व योगेश काळभोर हे दारु पित बसले होते. त्यावेळी पोपट म्हात्रे तेथे आला. तो योगेश काळभोरला म्हणाला, तू मला दारु पिण्यासाठी पैसे देत नाहीस, मला सारखा त्रास देतोस, मला धमकी देतोस, असे म्हणून योगेश काळभोर याच्या डोक्यात सिमेंटच्या गट्टुने मारहाण केली. तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यु झाला. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करीत आहेत.