पुण्यात अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन लुटले; तीन टोळकी जेरबंद

    पुण्यात अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन लुटले; तीन टोळकी जेरबंद

    पुणे: राज्यात लुटमारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अशातचं आता सिगारेट मागण्याच्या बहाण्याने जवळ जावून तिघांनी दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यांना मारहाण करून लुटल्याची घटना कात्रज-देहूरोड बायपासवर नऱ्हे परिसरात घडली आहे.

    या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

    सागर शिरोळे, संग्राम मोरे आणि विराज भोसले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी जित पांडुरंग कांबळे (वय १८, रा. सातारा) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ही घटना तीन जानेवारीला पहाटे दोन ते चार या वेळेत घडली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आणि त्याचे दोन अल्पवयीन मित्र नऱ्हे परिसरातील ओमकार लॉज बाहेर थांबले होते. त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ आले. त्यांनी तक्रारदार आणि त्याच्या मित्रांकडे सिगारेट मागण्याचा बहाणा केला. मुलांनी सिगारेट नसल्याचे सांगितले असता, आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला आणि जबरदस्तीने त्यांना कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तक्रारदार आरोपींच्या हातून निसटला. त्याने तेथून पळ काढला. मात्र, इतर दोन मुलांना आरोपींनी कारमध्ये बसवले आणि तेथून पळ काढला. कारमध्ये त्यांनी मुलांकडील तीन मोबाइल हिसकावून घेतले. त्यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर एका मुलाला अज्ञात स्थळी सोडले. तेथून पुढे गेल्यानंतर दुसऱ्या मुलाला कारमधून उतरवले आणि ते पसार झाले.

    दरम्यान, तक्रारदाराने या काळात सिंहगड रस्ता पोलिसांना संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून परिमंडळ तीनचे उपायुक्त संभाजी कदम यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. यामध्ये स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांची पथके देखील कामाला लागली होती. अवघ्या दीड तासात पोलिसांनी आरोपींचा माग काढून त्यांना ताब्यात घेतले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *