कोयत्याचा धाक दाखवत मनी ट्रान्सफरच्या दुकानामध्ये दरोडा; २४ तासात आरोपी गजाआड

    कोयत्याचा धाक दाखवत मनी ट्रान्सफरच्या दुकानामध्ये दरोडा; २४ तासात आरोपी गजाआड

    रांजणगाव: कारेगाव ता. शिरुर येथील चिंतामणी हॉस्पिटलजवळ एका मनी ट्रान्सफरच्या दुकानात चौघांनी कोयत्याने दहशत माजवत दुकानात तोडफोड करत पस्तीस हजार रुपये चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

    याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसि पोलिस स्टेशन येथे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या चारही आरोपींना २४ तासांमध्ये अटक करण्यात आली आहे.

    प्रथमेश उर्फ बच्चा नवले, आयर्न नवले, ओम पवार व वैभव गाडे (सर्व रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत ज्ञानेश्वर कान्हू डांगे (वय २१ वर्षे रा. सोने सांगवी ता. शिरूर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली.

    कारेगाव ता. शिरुर येथील ज्ञानेश्वर डांगे व ऋषिकेश डांगे हे त्यांच्या मनी ट्रान्सफरच्या दुकानात असताना प्रथमेश नवले सह तिघेजण दुकानात आले त्यांनी ज्ञानेश्वर व ऋषिकेश यांना शिवीगाळ दमदाटी करत दुकानाचे शटर खाली घेतले. त्यानंतर घेऊन दोघांना कोयत्याचा धाक दाखवत दुकानातील दरवाज्याची काच व फिंगर प्रिंट घेण्याचे डिवाइस मशीन फोडून नुकसान केले. तसेच कोयता दाखवत दुकानातील ड्रावरमध्ये असलेले पस्तीस हजार रुपये काढून घेत हातातील कोयता फिरवत दहशत माजवत चौघेजण पसार झाले.

    सदर गुन्हा घडल्याबाबत माहिती प्राप्त होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील सिसीटिव्ही फुटेजची पहाणी केली असता त्यामध्ये एकुण पाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यास दरोड्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे.

    गुन्हा घडल्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी तपास पथके तयार करुन रवाना केली होती. या तपास पथकाच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपींचा २४ तासात शोध घेण्यात आला आहे. तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपी प्रथमेश उर्फ बच्चा नवले याचा तपास पथकाच्या मदतीने शोध सुरु आहे.

    पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ तिडखे हे करत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *