गांजा विक्रीसाठी आलेली दोन टोळकी जेरबंद, गुन्हे शाखेच्या युनिट एक कडील एस पी टी मार्शल यांची उल्लेखनीय कामगिरी

    गांजा विक्रीसाठी आलेली दोन टोळकी जेरबंद, गुन्हे शाखेच्या युनिट एक कडील एस पी टी मार्शल यांची उल्लेखनीय कामगिरी

    पुणे: शहरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एक कडील एस पी टी मार्शल यांनी पकडले. त्यांच्याकडून ७ हजार ५५० रुपयांचा ८२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.

    समाधान केदा पवार (वय ३३, रा. लोहनेर, ता. देवळा, जि. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. अपर डेपो, पवननगर, जगताप डेअरीसमोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

    नववर्षाच्या अनुशंगाने शहरात अनुचित प्रकार घडू नये, म्हणून बंदोबस्त लावण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक पेट्रोलिंग करत असताना खडक एस पी टी मार्शल वरील पोलीस अंमलदार सुजय रिसबुड यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही जण शुक्रवार पेठेमध्ये गांजा विक्रीसाठी येणार आहेत. ही माहिती मिळताच मार्शल यांच्या मदतीसाठी अधिकारी व पोलीस अंमलदारांचे पथक पाठविले. त्यांनी शुक्रवार पेठेतील सुशिल लॉजसमोर रोडवर थांबलेल्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ हजार ५५० रुपयांचा ८२० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल, एक दुचाकी असा ४७ हजार ५५० रुपयांचा माल जप्त केला आहे.

    सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक पी ए काळुखे, पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंके, शुभम देसाई, सुजय रिसबुड, रफिक मुल्ला, महेश कुंदे, शशि गाडे आणि अजित शिंदे यांनी केली आहे.

    Related post

    तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला; दोघे अटकेत

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची घटना हडपसर परिसरातील रामटेकडी येथे घडली आहे. या…
    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *