कारवाई करण्याचा केवळ शो न करता ठोस कारवाई करा, दबाव झुगारून अतिक्रमणे हटवा – मुरलीधर मोहोळ

    कारवाई करण्याचा केवळ शो न करता ठोस कारवाई करा, दबाव झुगारून अतिक्रमणे हटवा – मुरलीधर मोहोळ

    पुणे: शहरात जागोजागी अतिक्रमणे केली जात आहेत. सर्व प्रमुख रस्ते आणि त्यावरील पदपथ अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले आहेत. याबाबत सूचना करूनही प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत असेल, तर संबधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल, अशा शब्दांत केंद्रीय सहकार राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

    याबाबत कोणी दबाव आणत असेल, तर त्याला जुमानू नका, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केल्या. त्यांनी महापालिकेत शहरातील विविध प्रकल्पांची आढावा बैठक घेतली. या वेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, आमदार हेमंत रासने, सुनील कांबळे, भीमराव तापकीर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्यासह महापालिका अधिकारी व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

    या वेळी महापालिकेची कामाची गती मंदावलेली असून, विकासकामांचा वेग वाढविण्याच्या सूचनाही मोहोळ यांनी प्रशासनास केल्या. यापुढे प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले. या बैठकीत समान पाणीपुरवठा, नदीकाठ सुशोभीकरण, जायका, शिवणे- खराडी रस्ता, एचसीएमटीआर, मिसिंग लिंक आदी प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

    महापालिका प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत समान पाणीपुरवठा योजना, मुळा- मुठा नदी शुद्ध करणे, नदीकाठ सुधार प्रकल्प, तसेच उड्डाणपुलांच्या कामाचा आढावा घेतला. लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांंना दैनंदिन समस्यांचा सामनाही करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ विकासकामांची गती वाढविण्याच्या, तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या आहेत.

    मोहोळ म्हणाले, की काही दिवसांपूर्वी शहरातील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला केल्या होत्या. दोन दिवस कारवाईचा दिखावा झाला. त्यानंतर मात्र शहरातील अतिक्रणे कमी होण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. त्यामुळे कारवाई करण्याचा केवळ शो न करता ठोस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्याचा अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. सर्व प्रमुख रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करून रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

    – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *