धनकवडीत टोळक्याची कोयता उगारून दहशत, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    धनकवडीत टोळक्याची कोयता उगारून दहशत, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    धनकवडी (पुणे): धनकवडीत काेयते उगारून टोळक्याने चार मोटारी, तसेच दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

    तोडफोड प्रकरणात साहिल दुधाणे याला अटक करण्यात आली आहे.

    त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाइट्स, मोहननगर, धनकवडी) याने सहकारनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुधाणे याच्याशी चव्हाण याचा वाद झाला होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवून चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखविला. मला धनकवडीचा भाई म्हणतात, असे सांगून त्याने त्यांच्यावर कोयते उगारत जीवे मारण्याची धमकी दिली.

    आरोपींनी धनकवडीतील बसथांब्याजवळ रस्त्यावर लावलेल्या चार मोटारींच्या काचा, तसेच दोन दुचाकींची तोडफोड केली. चव्हाणला धमकावून आरोपी मोटारीतून पसार झाले. हवालदार चव्हाण तपास करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *