कोर्टी यार्ड हॉलिडेज वर्ल्ड कंपनीने 2 लाख 77 हजार रूपयांना घातला गंडा, कंपनीच्या आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

कोर्टी यार्ड हॉलिडेज वर्ल्ड कंपनीने 2 लाख 77 हजार रूपयांना घातला गंडा, कंपनीच्या आठ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: क्रेडिट कार्ड पाहण्यासाठी घेत, ते स्वाईप करून 2 लाख 77 हजार रूपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पंचतारांकित हॉटेलबाबतच्या विविध ऑफर सांगून हा प्रकार केल्याप्रकरणी कोर्टी यार्ड हॉलिडेज वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष कुमार अरोरा, साही अलम, दीपक कौशल, प्रभांशू गौर, अकशित कक्कर, रेहान मलिक, गजेंद्र सिंग, वंश ठाकूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत रितेशकुमार अशोककुमार बजाज (46, रा. टकसन इस्टेट फेज2, रेडिसन ब्लू, खराडी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल़या माहितीनुसार, सदर प्रकार 1 ऑक्टोबर 2021 ते 30 ऑगस्ट 2022 दरम्यान घडला.

कोर्टी यार्ड वर्ल्डचा संशयित रेहान मलिक याने बजाज यांना फोन करून मेरियट हॉटेलच्या मेंबरसाठी आकर्षक ऑफर असल्याचे सांगितले. हयात हॉटेल येथे बोलवून गजेंद्र सिंग आणि वंश ठाकूर यांनी फिर्यादी बजाज आणि त्यांच्या पत्नीला पंचतारांकित हॉटेलमध्ये निम्म्या किमतीत 100 दिवसांचे पॅकेज सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.

दरम्यान बजाज यांच्याजवळील क्रेडिट कार्ड पाहण्यासाठी मागून त्याने ते स्वाईप करून त्यातून 2 लाख 77 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. तसेच इतर संशयित आरोपींनी हे पैसे परत करण्याचा बहाणा करून बजाज यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचे व अद्यापपर्यंत पैसे परत केले नसल्याचे नमूद केले आहे. हा गुन्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर दाखल झाला आहे.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *