पुणे: दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचे निकाल आज ऑनलाईन जाहीर

पुणे: दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचे निकाल आज ऑनलाईन जाहीर

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी, तसेच बारावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

संबंधित परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 2) दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावी पुरवणी परीक्षा 27 जुलै ते 12 ऑगस्ट आणि बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलै ते 24 ऑगस्टदरम्यान झाली. परीक्षेचा निकाल https://mahresult.nic.in Maharashtra Examination Results 2022 | mahresult.nic.in या संकेतस्थळावर आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील. तसेच माहितीची प्रत घेता येईल.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *