पुणे:स्वच्छता कर्मचारी आनंदात, अखेर थकीत वेतन मिळाले
- पुणे
- September 3, 2022
- No Comment
पुणे: कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कंत्राटी स्वच्छता कर्मचार्यांचा जुलै व ऑगस्ट महिन्याचा पगार थकल्यामुळे आर्थिक संकट ओढवले होते.
गणेशोत्सव व गौरी आगमनासारखे सण लक्षात घेता प्रशासनाकडून एका महिन्याचा थकीत पगार झाला.
स्वच्छता कर्मचार्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत अडीचशे कंत्राटी स्वच्छता कर्मचारी आहेत. मनपा प्रशासन व ठेकेदार यांच्यातील निविदा प्रक्रियेच्या मान्यतेसाठी त्यांचा जुलै व ऑगस्ट महिन्याचा पगार रखडला होता. हातावर पोट असणार्या स्वच्छता कर्मचारी यांना कुटुंबाचा गाडा ओढणे जिकिरीचे झाले होते.
घरातील किराणा व धान्य संपले होते, त्यातच माझी मुलगी बाळंतपणास आली आहे. तसेच काही महिलांच्या घरी गौरी बसतात. दोन महिने पगार नसल्याने खूप अडचण झाली होती. पण, गुरुवारी एका महिन्याचा पगार मिळाला, त्यामुळे सण आनंदात जाईल.
– महिला कामगार
जुलै महिन्याचे वेतन गुरुवारी अदा झाले असून, तीन-चार दिवसांत ऑगस्टचे देखील वेतन स्वच्छता कामगारांना दिले जाईल. तसे नियोजन केले असून, सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत. यापुढे स्वच्छता कामगारांना वेळेत पगार मिळावा, याबाबत खबरदारी घेतली जाईल.