पुणे: चतुःशृंगी परिसरात महिलेचा मृतदेह
- क्राईम
- September 3, 2022
- No Comment
पुणेः चतुःशृंगी मंदिर परिसरातील विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह गुरुवारी आढळला. महिलेचे वय अंदाजे 40 वर्षे असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य प्रवेशद्वारापासून साठ ते सत्तर मीटर अंतरावर एक विहीर आहे. त्या विहिरीत एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मंदिरात काम करत असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शविविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.
संबंधित महिलेची अद्याप ओळख पटली नसून कोणाला याबाबत काही माहिती मिळाली तर पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक कपिल भालेराव यांनी केले आहे.