मुंबई-पुणे महामार्गावर कारवाई करून चार कोटींचा गांजा जप्त, एनसीबी ची उल्लेखनीय कामगिरी
- क्राईम
- September 3, 2022
- No Comment
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने मुंबई-पुणे महामार्गावर कारवाई करून सुमारे चार कोटींचा गांजा जप्त केला आहे. जप्त केलेला गांजा गोवंडी-मानखुर्द परिसरात वितरित केला जाणार होता.
या प्रकरणी एकाला अटक केली असून त्याने गांजाचा साठा ओडिशा येथून आणला होता. उच्च प्रतीच्या गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर एनसीबीने गुरुवारी मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोलीजवळ सापळा रचला. नेमक्या कोणत्या गाडीतून गांजा येणार आहे हे स्पष्ट होत नव्हते. अखेर एनसीबीच्या अधिकाऱयाने खोपोलीजवळ एका गाडीला थांबवले. त्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीतून 210 किलो गांजा जप्त केला. एनसीबीच्या अधिकाऱयांना चकवा देण्यासाठी तो वारंवार मोबाईल नंबर आणि गाडीचा मार्ग बदलत होता.