पुणे:विवाहास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
- क्राईम
- September 3, 2022
- No Comment
पुणे: विवाह नोंदणीविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून तरुणीची फसवणूक केल्याने तिने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. उपचारासाठी तिला ससून रुग्णालयात करण्यात आले असता, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शंतनू संजय साळुंखे (रा. कुर्ला, मुंबई) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत तरुणीच्या भावाने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साळुंखेच्या विरोधात फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त करणे तसेच बलात्कार या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाह नोंदणी संकेतस्थळावर झालेल्या ओळखीतून साळुंखेने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्याने तरुणीला जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली, तेव्हा साळुंखेने तिला नकार दिला. साळुंखेने नकार दिल्याने माझी बहीण नैराश्यात होती. नैराश्य तसेच साळुंखेने केलेल्या फसवणुकीमुळे तिने आत्महत्या केल्याचे तरुणीच्या भावाने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, रुग्णालयात उपचार सुरू असताना तिने पोलिसांकडे जबाब दिला होता. मृत्युपूर्व जबाब तसेच तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनंतर साळुंखेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
*पुण्यात चोरट्यांचा थैमान, एकाच दिवशि चोरीच्या 3 घटना*
शहरातील विविध भागांत चोरीच्या तीन घटना समोर आल्या आहेत.
पाषाण-सूसरोड येथे एका जेष्ठ व्यक्तीच्या खिशातून चोरट्यांनी 19 हजार रुपयांचा मोबाईल व रोकड असा 24 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी केला. याप्रकरणी दिलीप राऊत (वय 71, रा. पाषाण-सूस रोड) यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तसेच, सिंहगड रोड परिसरात एका व्यक्तीच्या खिशातील 10 हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी चोरी केला. याप्रकरणी तानाजी बधे (वय 53, रा. दत्तवाडी) यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तर, रस्त्याने पायी चालत निघालेल्या एका 65 वर्षीय महिलेच्या पिशवीतून चोरट्याने 70 हजार रुपयांचे दागिने चोरी केले.