उपमुख्यमंत्री फडणवीस: पुण्यातून लोकसभा लढवणार नाही
- देश
- September 3, 2022
- No Comment
पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्याचा पालकमंत्री कोण होणार याबाबत जोरदार चर्चा रंगत आहेत. याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. पुण्याचे पालकमंत्री हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, असे बोलले जात होते. मात्र, खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच याबाबत आज (ता.2 सप्टेंबर) त्यांनीच स्पष्टीकरणं दिले असून मी पुण्याचा पालकमंत्री होणार नाही, असे जाहीर केले.
पीमसी ई – बस डेपो उद्घाटन सोहळ्या प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटीलही उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, पुण्याचा पालकमंत्री होणार नाही आणि पुण्याची लोकसभाही लढवणार नाही. तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का ? या फक्त माध्यमात चालवल्या जाणार्या चर्चा आहे. मला नागपूरचा पालकमंत्री व्हायला आवडेल. दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी पुणे शहराला दोन महापालिका बाबत विधान केले. त्यावर ते म्हणाले, पुण्याचे दोन भाग होणार हा नवीन वाद कशाला काढता आहे जेव्हा करायचा आहे तेव्हा बघू. राज्य सरकारपुढे आज तरी कुठलाही प्रस्ताव पुढे नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो. मात्र, आज कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे नाही. मुंबईची तिसरी महानगरपालिका करण्याचा देखील कुठलाही विचार आता नाही. नवनवीन वादाचे विषय काढू नका. आपल्याला विकासाकडे जायचं आहे. माझी आणि अशोक चव्हाण यांच्याशी भेट झालेली नाही. तसेच गणपतीच्या एका ठिकाणी मी पोहोचलो आणि ते देखील पोहोचले. मात्र, त्यांच्या आणि माझी कुठेही भेट झालेली नाही. या केवळ माध्यमातील चर्चा असून त्यात तथ्य नाही.